घरमहाराष्ट्रनागपूरNana Patole : हायवे मॅन सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होणार, नाना पटोलेंचा...

Nana Patole : हायवे मॅन सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होणार, नाना पटोलेंचा टोला

Subscribe

काँग्रेसकडून विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी पटोलेंनी भाजपाचे उमेदवार नितीन गडकरींवर सडकून टीका केली.

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी यंदा अटीतटीची लढत होणार आहे. कारण यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्याशी थेट लढत होणार आहे. नितीन गडकरी आणि विकास ठाकरे या दोन्ही उमेदवारांकडून आज (ता. 26 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी नाना पटोलेंनी गडकरींवर सडकून टीका केली. (Nana Patole criticizes BJP Nagpur Lok Sabha candidate Nitin Gadkari)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : विदर्भातील पाच जिल्ह्यात होणार पहिल्या टप्प्यात मतदान, अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न पटोलेंकडून उपस्थित करण्यात आला.

तर, नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेस पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार 2.5 लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आज महाविकास आघाडीच्या विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यात आली व नंतर अर्ज दाखल करण्यात आला.

- Advertisement -

विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिसन ओझा, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -