घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू, प्रभादेवी प्रकरणावरुन नाना पटोलेंची शिंदे सरकारवर टीका

महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू, प्रभादेवी प्रकरणावरुन नाना पटोलेंची शिंदे सरकारवर टीका

Subscribe

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू असल्याचं विधान करत शिंदे सरकारवर टीका केली आहे.

प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या प्रकारावरून नाना पटोलेंनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू आहे. गुवाहाटी आणि त्यानंतरच्या प्रकारामुळे महाराष्ट्राची राजकीय बदनामी देशात झाली. दिवसाढवळ्या गोळीबार, मुलींचे अपहरण या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील एका पक्षासोबत कार्यक्रमात हजेरी लावणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. राज्यकर्त्यांनी संविधानाच्या आधारावरच काम करावं असं अपेक्षित आहे. पण आज महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे, असं नाना पटोले म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटानेही मंच उभारला होता. शिंदे गटातील लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. यातून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेनेतील माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद निर्माण झाले. शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढत गेला. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हा वाद इथेच शमेल असं वाटत असतानाच या वादाबाबत शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहून अपशब्द वापरले. यावरून शिवसैनिक संतापले आणि त्यांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. यानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. तसेच, त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातला असल्याचं म्हटलं जातंय.

पोलिसांच्या कारवाईनंतर दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. आमदार सदा सरवणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. मात्र, सदा सरवणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, शिवसेना-शिंदे गटात मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. हे गुन्हा मागे घेण्यता येतील, असं पोलिसांनी अरविंद सावंतांना स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा : सदा सरवणकरांनी दोनदा गोळीबार केला, पोलिसांकडूनही दखल; अरविंद सावंतांचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -