घरताज्या घडामोडीअजितदादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्या म्हणून काय झाले ?, नाना पटोले आक्रमक

अजितदादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्या म्हणून काय झाले ?, नाना पटोले आक्रमक

Subscribe

EVM मुद्द्यावर महाविकास आघाडीत वादाला तोंड

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेले नाना पटोले यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मताबाबत टिप्पणी करून महाविकास आघाडीतील मतभेदात आणखी एक मुद्द्याची भर घातली आहे. नाना पटोलेंनी अजित पवारांच्या ईव्हीएम मशीनला समर्थन देण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मतपत्रिकांचा मुद्दा पुढे केला आहे. राज्य घटनेनेच मला हा अधिकार दिला आहे. त्यामुळे या अधिकारासाठीची व्यवस्था राज्यातील मतदारांसाठी होणे गरजेचे असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्या तरीही ईव्हीएम विषयावर बोलण्याचा हा त्यांचा अधिकार आहे. तसाच मलाही मतपत्रिका मिळणे हा माझा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने याबाबतची व्यवस्था करावी असे ते म्हणाले. कॉंग्रेसच्या सोशल मिडिया कॅम्पेनच्या निमित्ताने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले होते अजितदादा ?

याआधी अजितदादा यांनी ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर बोलताना स्पष्ट केले होते की, काही राजकीय पक्षांच्या पराभवासाठी ईव्हीएम मशीनवर बोट ठेवण्याचा प्रकार काही नेत्यांकडून होत आहे. पण मला ईव्हीएम मशीनवर पुर्णपणे विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी अजितदादा यांनी देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या नुकत्याच राजस्थान आणि पंजाब विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबत वक्तव्य केले. या दोन्ही राज्यात कॉंग्रेसने चांगले यश मिळवत सरकारही स्थापन केले. या निवडणुकीतही ईव्हीएम मशीनचाच वापर करण्यात आला होता, असे अजितदादा म्हणाले. ज्याठिकाणी राजकीय नेते मोठ्या फरकाने निवडून येतात, त्याठिकाणी राजकीय पक्षांना ईव्हीएम मशीनबाबत कोणताच प्रॉब्लेम नसतो. पण ज्याठिकाणी उमेदवार पडतात आणि डिपॉझिट जप्त होते अशा ठिकाणी मात्र ईव्हीएम मॅनेज केल्याचा आरोप केला जातो असे अजितदादा म्हणाले. मीदेखील सहा ते सात निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनने व्यवस्थित निकाल मिळतो आणि म्हणूनच ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणुका घेण्यात काहीच अडचणी नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

अजितदादांच्या याच विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतदानाच्या वेळी मतपत्रिका मिळणे हा माझा संविधानिक अधिकार आहे. राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२८ नुसार विधानसभा निवडणुकांमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देणे हे संविधानातच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच मतपत्रिकांचा पर्याय देणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. संविधानापेक्षा कोणतीच मोठी व्यवस्था नसल्याचे ते म्हणाले. ईव्हीएमने मतदान करण्याचा जसा अजितदादांचा अधिकार आहे, तसाच मतपत्रिकांद्वारे मतदान करता येणे माझा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -