राज्यपाल कोश्यारींनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे – नाना पटोले

Nana Patole has demanded that Governor Koshyari should convene a special session immediately

राज्यात आठ दिवसांपासून राज्यात राजकीय अस्थिरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. राज्यातील राजकीय तमाशा थांबवला पाहिजे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

राज्यपालांवर टीका – 

राज्यपाल कार्यालयाचा विरोधक कसा वापर करतात याचं उत्तर द्यावे. नियमाप्रमाणे काम सुरू आहे त्यावर आक्षेप घेत असतील तर त्यांना लोकशाही मान्य नाही, अशी टीकाही नाना पटोले यानी केली आहे. गुवाहटीतील हॉटेलमध्ये 200 खोल्या बुक केल्याचे ऐकले आहे. चार्टर्ड फ्लाईटने हे आमदार रात्री फिरतात याची ईडी चौकशी का करत नाही? बंडखोर आमदारांवर 3 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहेत. याची चौकशी आता ईडी (ED) का करत नाही?, असा प्रश्नही  नाना पटोले यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार –

राज्यातील राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील जनतेच्या हे लाक्षात आले आहे. आमच्यासोबत महश्की आहे, असे एकनाथ शिंदे सांगत आहेत. त्यामुळे ही महाशक्ती कुठली आहे हे लपून राहिलेले नाही. जर बंडखोर आमदार मतदारांना धमकावत असतील तर हे फार गंभीर आहे, त्यावर त्वरीत कार्यावाही झाली पाहिजे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

राज्याचे तुकडे केंद्र सराकर करत आहे – 

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची होती. पण ते कशाची वाट बघत आहेत? हा प्रश्न आहे. विधानसभेत प्रक्रिया व्हायला पाहिजे. लोकशाहीचा खून करण्याचा केंद्राचा प्रयत्न होत आहे. राज्याचे तुकडे केंद्र सरकार करत आहे, असं ते म्हणाले.

बंडखोर आमदारांवर 3 हजार कोटींचा खर्च केला जात असल्याचं मी मीडियातून ऐकलं आहे. एका एका बंडखोर आमदाराला 50 कोटी रुपये दिले जात आहेत. यामागे कोण आहे. याची चौकशी का केली जात नाही. ईडी कुठे आहे? असा सवाल पटोले यांनी केला आहे.