घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडी सरकारमधील निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा, नाना पटोलेंची माहिती

महाविकास आघाडी सरकारमधील निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा, नाना पटोलेंची माहिती

Subscribe

मंत्रिंमंडळाच्या निर्णयाबाबत चर्चा नाही. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बदलाबाबत चर्चा करतील असे नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. काँग्रेस मंत्र्यांनी नाना पटोले यांची भेट घेतली होती यानंतर पटोलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकारमधील निधी वाटपाबाबत चर्चा केली असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या त्रुटींबाबत चर्चा केली असल्याचेही नाना पटोले म्हणाले. राज्यातील समान विकास करण्यासाठी निधीचा वाटपसुद्धा समान व्हावा अशी मागणी नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे यावेळी नाना पटोलेंनी सांगितले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत निधी वाटपाबाबत समान निधी वाटप करुन राज्याचा समान विकास कसा करता येईल याबाबत चर्चा झाली. अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्री स्वतः घेतील असे नाना पटोले म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे जे काही संजय राऊतांनी आरोप केले आहेत त्याची चौकशी तातडीने व्हावी आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर लक्ष ठेवून वेळेत कारवाई करावी अशी मागणी केली असल्याचे नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisement -

सरकारमधील त्रुटींबाबत चर्चा

महाविकास आघाडी सरकारचे जे काही कामकाज झाले. त्याच्यात काही त्रुटी होत्या त्या तीन पक्षांतील सरकारमध्ये अडचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या आहेत. तसेच मधल्या काळात जे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत त्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

ऊर्जा विभागातील निधी बाबत चर्चा

ऊर्जा विभागाचा महत्त्वाचे म्हणजे मागच्या सरकारने केलेल्या चुका आणि त्याचे परिणाम राज्याच्या सगळ्या शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपासून सगळ्यांना माहिती आहे. त्याचे परिणाम राज्यातील सर्व विद्युत ग्राहकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे वीज खंडीत कापण्यासारखे काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची आणि उद्योजकांची लाईन कापली जाऊ नये तसेच हा जो काही निधी कसा उभारता येईल याबाबत चर्चा झाली.

- Advertisement -

मंत्रिमंडळ निर्णयाबाबत चर्चा नाही

मंत्रिंमंडळाच्या निर्णयाबाबत चर्चा नाही. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बदलाबाबत चर्चा करतील.


हेही वाचा : बदनामी करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खुर्ची खाली करायची आहे का? चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -