Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 राहुल गांधींवरील कारवाई ही ठरवून केलेली..., नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधींवरील कारवाई ही ठरवून केलेली…, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

राहुल गांधींवरील कारवाईनंतर विधिमंडळ परिसरातलं वातावरण काहीसं तापल्याचं पहायला मिळालं. यावेळी कॉंग्रेस आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. विधिमंडळ परिसरात कॉंग्रेस आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईला विरोध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळात विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरातलं वातावरण काहीसं तापल्याचं पहायला मिळालं. यावेळी कॉंग्रेस आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. विधिमंडळ परिसरात कॉंग्रेस आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधींवरील कारवाईनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केलाय. “राहुल गांधीवरील कारवाई ही ठरवून केली. लोकसभेचा हा निर्णय लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाहीविरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भाजपा करतेय.” असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केलाय.

यापुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, “आपण हुकुमशाही व्यवस्थेकडे चाललो आहोत. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय झालाय. हे दुर्दैवी आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही सभात्याग केला आहे. गेल्या ९ वर्षांपासून नरेंद्र मोदींचं सरकार त्यांचे मित्रों नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या यांना सपोर्ट करण्याचं भाजपकडून सुरू आहे.” असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

- Advertisement -

तसंच ज्याप्रमाणे इंग्रज त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना फाशीची शिक्षा किंवा गोळ्या झाडत होत्या. तसाच प्रकार सध्या सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारविरोधात बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून दबावात ठेवण्याचं काम सुरू आहे. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भीतीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केलाय. भाजपच्या या कृतीचा आणि नरेंद्र मोदींच्या सरकराचा धिक्कार आहे, असं देखील यावेळी नाना पटोले यांनी म्हटलंय.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -