Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNana Patole : लोकशाहीची थट्टा खपवून घेणार नाही; आयोगाच्या खुलाशानंतरही काँग्रेस ठाम

Nana Patole : लोकशाहीची थट्टा खपवून घेणार नाही; आयोगाच्या खुलाशानंतरही काँग्रेस ठाम

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने बहुमताचा आकडा सहज गाठला आणि 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. पण यावेळी विरोधकांकडून मतदानाच्या टक्केवारीवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. पण या यशानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. तसेच, शेवटच्या तासात मतदानाची टक्केवारी कशी वाढली? असादेखील सवाल यावेळी विरोधकांकडून निवडणूक आयोगाला विचारला. यावरून निवडणूक आयोगानेदेखील खुलासा केला आहे. पण त्यावरून आता पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगावर निशाणा साधला आहे. तसेच, निवडणूक आयोगाने चालवलेली लोकशाहीची थट्टा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारादेखील दिला आहे. (Nana Patole on ECI clarifies on voting count increased in last hours on polling day)

हेही वाचा : ECI vs Congress : शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? आयोगाने दिले हे स्पष्टीकरण 

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (28 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. यावेळी मतदानादिवशी शेवटच्या काही तासांमध्ये लाखोंच्या संख्येने मतदान कसे वाढले? असा सवाल केला. यावर शुक्रवारी (29 नोव्हेंबर) निवडणूक आयोगाने आपला सोशल मीडियावर खुलासा सादर केला. पण लगेचच, नाना पटोले यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा आयोगावर निशाणा साधला. “आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 20 नोव्हेंबरला रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. तेच दुसऱ्यादिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.05 टक्के होती. स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत, 1.03 टक्केची तफावत आली कुठून?” असा सवाल त्यांनी केला.

एका दिवसामध्ये तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ झाली कशी? असा सवाल नाना पटोले यांनी केला. यावेळी, “लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. त्यामुळे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल, तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने चालवलेली लोकशाहीची थट्टा आम्ही खापवून घेणार नाही.” असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगालाच इशारा दिला. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत 5 ते 6 जणांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटून त्यांच्याशी याबाबत खुलासा मागणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -