Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माझ्याकडे खूप मसाला, वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार, नाना पटोलेंचा तांबेंना इशारा

माझ्याकडे खूप मसाला, वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार, नाना पटोलेंचा तांबेंना इशारा

Subscribe

हा परिवारातला वाद आहे. त्यामुळे हा वाद जास्तच अंगावर आणलात तर माझ्याकडेही भरपूर मसाला आहे. मला त्या पातळीवर जाऊ देऊ नका, असा इशारा मी परवा दिला होता. परंतु त्या खोलात मला जायचं नाही. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे. परंतु जी लोकं दोन हातावर आणि नावेवर चालतात. त्यांच्यासाठी माझ्याकडे भरपूर मसाला आहे. त्यामुळे यावर आज मी काही प्रतिक्रिया देणार नसून आमचे प्रवक्ते यावर बोलतील. त्यांना आम्ही कागदपत्रं आणि सर्व पुरावे प्रसार माध्यमांसमोर दाखवण्यासाठी सांगितलं आहे. जेणेकरून सगळी वस्तुस्थिती तुम्हाला समजेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पुण्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पाडली. त्यानंतर नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्यजित तांबेंच्या आरोपांवर विश्वास आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, आमचे प्रवक्ते त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहेत. कोणावर काय बोलावं यावर आमचे प्रवक्ते उत्तरं देणार आहेत. मुंबईला प्रवक्त्यांची पत्रकार परिषद सुरू असेल. परंतु त्यावर ते प्रतिक्रिया देतील. नाशिकमध्ये सर्व पक्षीय हायहोल्टेज ड्रामा झाला आहे. त्याबद्दल मी खूप काही बोलणार नाही. त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप आमच्यावर केले आहेत. त्यावर आमचे प्रवक्ते पुराव्यानिशी सर्व माहिती देतील, त्यानंतर त्यावर त्यांनी बोलावं, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

७ उमेदवारांची नावं आम्ही हायकमांडला पाठवली आहेत. उद्यापर्यंत ती नावं हायकमांडकडून जाहीर होणार असून महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहे. काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही उमेदवारांची नावं जाहीर झालेली नाहीत, असं नाना पटोले म्हणाले.

मी विखे पाटलांविषयी एकेदिवशी बोलणार आहे. ते आता आमचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागले आहेत. सध्या त्यांची जागी हे घेऊ पाहत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल नंतर बोलेन, असं म्हणत नाना पटोलेंनी विखेंवर टीका केली.


- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच केली एबी फॉर्ममध्ये गफलत, सत्यजित तांबेंकडून भांडाफोड


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -