घरमहाराष्ट्रनाशिक"भाजपची घरं कशी फुटतात हे आता कळेल!"; नाना पटोलेंचा इशारा

“भाजपची घरं कशी फुटतात हे आता कळेल!”; नाना पटोलेंचा इशारा

Subscribe

सत्यजिंत तांबेबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या गौफ्यस्फोटावर देखील नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यापाठोपाठ आता तांबेंच्या भाजपा प्रवेशासंदर्भातल्या चर्चांना ऊत आला आहे. भाजपाकडून तांबेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर या चर्चेला ऊत आलेला असताना आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. तसंच कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपविरोधात मोठं वक्तव्य केलंय.

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राज्यातील बदलत्या समीकरणांची विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी विधान परिषद, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक पदवीधरचा निकाल व सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, “नशिकमध्ये सुधीर तांबेनी आमच्यासोबत विश्वासघात केला. भाजपनं दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम केलंय. त्याचे परिणाम आता भाजपला भोगावे लागतील. त्यांनी कॉंग्रेसचा एक नेला तर आम्ही आमच्या नाशिक विभागात ५० आमदार उभे करू. मग भाजप आमचे किती आमदार घेऊन पळतात, हे पाहू” यादृष्टीने कॉंग्रेस रणनिती आखत असल्याचं देखील नाना पटोले म्हणाले. “प्रजा कोण, राजा कोण , जनतेने याचं उत्तर दिलं पाहिजे. भारत जोडोचा निवडणूकीवर सकारात्मक परिणाम झाला.” असं देखील ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

सत्यजित तांबेंच्या विजयानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

सत्यजित तांबेच्या विजयानंतर एकीकडे त्यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या बातम्या रंगू लागल्या असताना दुसरीकडे मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचं चित्र दिसतंय. सत्यजित तांबे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला होता. “शरद पवार यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता. सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली पाहिजे होती.” असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले व्यक्त झाले आहेत. “सत्यजिंत तांबे या निवडणूकीत राष्ट्रवादीने मदत केली होती. असं जर अजित पवार यांचं म्हणणं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तेव्हढी मदत केली असतील तर आज त्या जिंकल्या असत्या” असं देखील नाना पटोले म्हणाले.

नाशिक पदवीधरमध्ये विजय मिळविल्यानंतर सत्यजीत तांबेंना काँग्रेस पक्षात परत घेणार का? याबाबत नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे. “कॉंग्रेसकडे यासंदर्भात प्रस्ताव येत नाही तोपर्यंत यावर निर्णय होणार नाही” असं वक्तव्य देखील नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -