Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा नौटंकी आहे का? नाना पटोलेंचा खोचक...

देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा नौटंकी आहे का? नाना पटोलेंचा खोचक सवाल

गुजरातला द्यायला केंद्र सरकारकडे पैसे आहेत मात्र महाराष्ट्राला द्यायला नाहीत? - नाना पटोले

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागातील दौरा नौटंकी आहे का? असा खोचक सवाल केला आहे. नाना पटोले यांनी महागाई, इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅलीचं आयोजन करुन केंद्र सरकारचा निषेध केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या दौऱ्यावर टीकास्त्र डागलं होतं, फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या सायकल रॅलीला नौटंकी म्हटलं होते यावरुन नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या तीन दिवसीय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेहमीच आपल्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चेत असतात, नाना पटोले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसकडून महागाई, इंधन दरवाढीविरोधीत राज्यभरात सायकल रॅलीच आयोजन केलं होते. तसेच मुंबई काँग्रेसकडूनही रॅलीचं आयोजन करण्यात आल होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला नौटंकी म्हटलं होते त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा दौरा नौटंकी आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले ४ दिवसांनंतर दौरा करणार

- Advertisement -

राज्यात अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राजकीय मंडळी दौरे करत आहेत. परंतू राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा न करण्याचे आवाहन केले आहे. यावर नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, शरद पवार यांनी त्या भागाशी संबंध नसलेल्या राजकीय व्यक्तींनी दौरा करु नये असे म्हटलं आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर आणि मदत कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे दौरा न करण्याचे आवाहन केले आहे. जर कोणाला दौरा करायचा असेल तर करु शकतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न असून दौऱ्यामुळे तिथली परिस्थिती समजते अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

महाराष्ट्राला द्यायला पैसे नाहीत का?

गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी दौरा करुन गुजरातला मदत पॅकेजची घोषणा केली होती. परंतू महाराष्ट्राला केली नव्हती. महाराष्ट्राचे केंद्राकडे १ लाख कोटी रुपये बाकी असून ते अजून दिले नाहीत. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलचे दर वाढवत आहेत. गुजरातला द्यायला केंद्र सरकारकडे पैसे आहेत मात्र महाराष्ट्राला द्यायला नाहीत? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. तर केंद्र सरकारने आज ७०० कोटींच्या मदतीची घोषणा केली असून ती मागच्या वर्षीच्या अवकाळी पावसाची असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे केंद्राने आपत्ती व्यवस्थापन कायदा लक्षात ठेवून तात्काळ पेसे द्यावेत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

- Advertisement -