आमदारांची उपस्थिती बघून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणार, नाना पटोलेंचे वक्तव्य

"किती आमदार उपस्थित असणार यावर तिनही पक्षाचा मिळून निर्णय होणार आहे", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

Nana Patole

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना केली. त्यानुसार आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपद निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केले आहे. “कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे आज किती आमदार उपस्थित असणार यावर तिनही पक्षाचा मिळून निर्णय होणार आहे”, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडणूकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तिनही पक्षाचे एक मत

“कृषी कायद्याबाबत केवळ काँग्रेसची मागणी नाही आहे. तर तिनही पक्षाची मिळून ही मागणी आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारला कृषी कायदा करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करावा. त्याचप्रमाणे वेळ आली तर त्याला पब्लिक डोमेनमध्ये टाकावे आणि त्यात शेतकऱ्यांचेही मत घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करण्याचा निर्णय घेत घ्यावा”, अशी भूमिका काँग्रेसची आहे.

केंद्राने तिनही कृषी कायदे मागे घ्यावे

“देशामध्ये केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले. देशभरातील शेतकरी त्या कायद्याविरोधात आजही आंदोलन करत आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने त्या कायद्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता केंद्राने तिनही कृषी कायदे मागे घ्यावे”, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.


हेही वाचा – maharashtra assembly monsoon session 2021 : पावसाळी अधिवेशनात ‘ही’ विधेयके, अध्यादेश येणार चर्चेला