घरताज्या घडामोडीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसची स्वबळावर तयारी, पटोलेंनी मागवली इच्छुकांची यादी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसची स्वबळावर तयारी, पटोलेंनी मागवली इच्छुकांची यादी

Subscribe

सर्व प्रभाग, वॉर्डातील इच्छुक उमेदवारांचे नावं प्रदेश कार्यालयाला तात्काळ कळवावे. जेणेकरुन इच्छूक उमेदवारापासून सक्षम उमेदवाराचा शोध घेता येईल असे निर्देश नाना पटोले यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेसने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यभरातून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाची यादी मागवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्तेत आल्यापासूनच काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याबाबतची घोषणा करण्यात येत होती. आता एक परिपत्रक जारी करुन काँग्रेसनं निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला १ नंबरचा पक्ष कऱण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार पटोले काम करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष एकत्र असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची यादी मागवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे प्रभाग रचना व आरक्षण निवडणूक आयोग लवकरच जाहिर करणार आहे. सर्व प्रभाग, वॉर्डातील इच्छुक उमेदवारांचे नावं प्रदेश कार्यालयाला तात्काळ कळवावे. जेणेकरुन इच्छूक उमेदवारापासून सक्षम उमेदवाराचा शोध घेता येईल असे निर्देश नाना पटोले यांनी दिले आहेत.

नाना पटोलेंच्या आदेशावरुन स्वबळाची तयारी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यावर ठाम आहेत. राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपमध्ये असताना चांगला अन् राष्ट्रवादीत गेल्यावर १ वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा खोचक सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -