घरताज्या घडामोडीनाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले (Nana Patole) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला आहे. नाना पटोले आज दुपारी ४ च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर नाना पटोले विधानभवानकेडे निघाले. विधानसभा उपाध्यक्षांकडे नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला.

गेले काही दिवस महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरु आहे. नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील १० जनपथ येथे राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधींच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज नाना पटोले यांनी सह्याद्रीवर कॅबिनेट बैठकिच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विधान भवनाकडे निघाले.

- Advertisement -

nana patole resign letter

विधानसभाध्यक्षपदी कोण?

नाना पटोले यांच्या राजीनाम्‍यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे. हे पद काँग्रेसकडेच राहिल्‍यास ज्‍येष्‍ठ नेते पृथ्‍वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तसंच सुरेश वरपूडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदावर आता पुन्हा चर्चा होणार असल्याचं विधान केल्यानं हा गुंता वाढण्याची शक्यता आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -