Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार - नाना पटोले

आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार – नाना पटोले

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आमची कोणालाही जबरदस्ती नाहीये. पहिल्यांदाही नव्हती आणि आजही नाहीये. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही यांच्यामध्ये सामील झालो आहोत. आम्हाला विरोधी पक्षात बसायचं असल्यास आम्ही बसू. तसेच आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. शिवसेनेला कुठे जायचं असल्यास त्यांनी जावं, परंतु आम्ही विरोधी पक्षात राहू. आमचे सर्व ४४ आमदार मुंबईत आहेत. तसेच कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या सर्व सद्यास्थितीवर बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, मविआ सरकारला कोणताही धोका नाही. विरोधी पक्षात बसायची आमची तयारी आहे. असे सांगत नाना पटोले यांनीही मविआ सरकार बरखास्त होण्याच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या सर्व षडयंत्रामागे भाजप आहे. शिंदेकडे असलेले संख्याबळ केवळ दिखावा असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ही शिवसेनेची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाहीये. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठिशी उभे आहोत. मी काल त्यांना भेटून आलो. तुम्ही जे म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत. ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता. तसाच विश्वास त्यांच्यावर राहणार आहे.


हेही वाचा : स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार


- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -