घरमहाराष्ट्रराज्यपालांची भूमिका संशयास्पद, राजभवन भाजप कार्यालय झालंय - नाना पटोले

राज्यपालांची भूमिका संशयास्पद, राजभवन भाजप कार्यालय झालंय – नाना पटोले

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भूमिका ही संशयास्पद असून राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. यावेळी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतला आहे, महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे गंभीर आहेत. त्या प्रकरणाची सुस्पष्ट चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे, असं पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने क्लिन चीट देत होते त्यावर देखील नाना पटोलेंनी प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांच्या काळात ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यावर फडणवीसच उत्तर द्यायचे. ते स्वत: न्यायाधीश होऊन क्लिन चिट देत होते. फडणवीस तेव्हा न्यायाधीशाच्या भूमिकेत नव्हते का? असा सवाल देखील नाना पटोले यांनी केला. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फडणवीस यांच्या सारखी न्यायाधीशाची भूमिका ते घेत नाहीत.

- Advertisement -

काँग्रेसने देशाला उभं करण्याचा प्रयत्न केला. भाजप सरकारने देश विकायला काढला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -