घरमहाराष्ट्र'त्या' गुंडाची फोटोसहित माहिती प्रसिद्ध करा; माधव भांडारींचे पटोलेंना आव्हान

‘त्या’ गुंडाची फोटोसहित माहिती प्रसिद्ध करा; माधव भांडारींचे पटोलेंना आव्हान

Subscribe

‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला असून ‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी,’ असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे असे स्पष्ट करून माधव भांडारी ह्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे.’

- Advertisement -

‘कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीकाही भांडारी ह्यांनी केली आहे.

नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. नागपूरात आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईत आमदार अतुल भातखळकर यांनी पटोलेंविरोधात आंदोलनं केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांना अटक करावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जातेय.


पंतप्रधान मोदी न थांबता तासन् तास भाषण कसे देतात? मोदींच्या Teleprompter ची अजब गोष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -