Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्ष लागणार- नाना...

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्ष लागणार- नाना पटोले

Subscribe

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्ष लागणार आहेत. मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही ? असा सवाल करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पटोले यांनी टि्वट केले असून त्यात हा सवाल उपस्थित केला आहे.


गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे. तसेच वाढत्या महागाीवरूनही भाजप नेते आणि ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोना संदर्भातील व्हर्च्युअल बैठकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरूनही सर्वच राज्यातील सरकारला फैलावर घेतले होते. याचपार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्ष लागणार आहेत. मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही असा सवाल केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -