अंबानींच्या हेलिपॅडसाठी भाजपचं ‘हे’ कटकारस्थान – नाना पटोले

Nana Patole accuses BJP of trying to divide state government and clarification statement
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन "मविआ"मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचे भाजपवर आरोप

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी घरावर हेलिपॅड हवंय, अशी मागणी केली होती. पण राज्य सरकारकडून याला मंजुरी दिली जात नव्हती. त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका आहे, असं भासवलं जातंय. त्यामुळे त्यांना हेलिपॅडची मुंजरी द्यावी जेणेकरून ते हवाई प्रवास करतील. तसेच अंबानीच्या हेलिपॅटसाठी घराबाहेर भरलेल्या स्फोटकाचं स्कॉर्पिओ प्रकरण हे भापजचं कटकारस्थान आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पुढे नाना पटोले म्हणाले की, ‘मुकेश अंबानीच्या घरासमोर जवळपास १ किलोमीटर सापडलेल्या गाडीमध्ये जिलेटीन आढळलं. याच पार्श्वभूमीवर गेला तीन दिवसांपासून विधानसभेत गदारोळ सुरू आहे. पण या घटना ज्यापद्धतीने अंबानी कुटुंबियांसोबत घडत जातेय. म्हणजेच २००९मध्ये अनिल अंबानीच्या हेलिकॉप्टरमध्ये दगडं सापडली आणि घातपात होण्याचा प्रयत्न त्या काळात वर्तवला गेला होतो. यामध्ये बोरगे नावाच्या संशयिताचं नाव पुढे आलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तसेच २०१३मध्ये दाऊदचा व्यक्ती डेनिला सोडण्यासाठी अनिल अंबानींच्या घर उडवण्याच्या दृष्टीकोतून एक पत्र आलं. त्याला सोडलं नाहीतर अनिल अंबानीला उडवू अशा पद्धतीची एक धमकी आली. अशाप्रकारे हिरेन प्रकरण देखील पुढे आलं आहे.’

‘शेतकरी आंदोलनात अंबानी कुटुंबाचं नाव मोठ्या प्रमाणत आलं. त्यामुळे शेअर बाजारात अनेक लाखोंच नुकसान झालं. त्यामुळे भाजप हा मुद्दा उचलून सभागृहांच्या माध्यमातून अंबानी कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करतंय का?, असा सवाल आमचा आहे. ज्याप्रमाणे बोरसेचं प्रकरण झालं होत तसंच हिरेन प्रकरण पुढे आलं आहे. पण आता भाजप शेतकऱ्यांच्या विरोधातील अंबानींना सहानभूती मिळण्यासाठी भाजप हे सगळं करत आहे. तसेच भाजप अंबानी प्रकरण दुसरीकडेच वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाजपने सभागृहाचा वेळ देखील वाया घालावला आहे. एटीएस तपास करत आहे, पण जर भाजपकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावे’, असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा – वाझेंची उचलबांगडी हे सरकारचं मलमपट्टी लावण्याचं काम – प्रविण दरेकर