घरताज्या घडामोडीराज्यातील इतिहासात प्रथमच भाजपच कार्यालय राजभवनातून चालतंय, नाना पटोलेंची खोचक टीका

राज्यातील इतिहासात प्रथमच भाजपच कार्यालय राजभवनातून चालतंय, नाना पटोलेंची खोचक टीका

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारला विधानसभा अधिवेशन अधिक दिवसांचे ठेवण्यासाठी निवेदन केलं आहे. या निवदेनानुसार राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना फडणवीसांच्या मागण्या योग्य असून त्यावर कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचे कार्यालय राजभवनातून चालत असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. या विधानसभा अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी भाजपकडून मागणी करण्यात आली आहे. तर अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरु असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपच्या मागण्या पुर्ण करण्याचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे कार्यालय हे राजभवन इथून चालत आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास सांगितले आहे. परंतु हे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाबाबत नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, अध्यक्षपद कोणाला द्यायचे याबाब काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील ठरवतील. यानंतर हे नाव काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात येईल मग हायकमांड त्याबाबत निर्णय घेईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

- Advertisement -

यंत्रणांचा दुरुपयोग

मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारच्यावेळी मंत्र्यांवर आरोप करण्यात आले परंतु फडणवीसांनी त्यांना निर्दोष असल्याचे दाखले दिले. त्यावेळी मंत्र्यांवर सीबीआय किंवा ईडीची तपास सुरु होत नव्हता. वाझे प्रकरणावरुन नाना पटोले यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे. वाझे प्रकरणात फडणवीसांनी जसे सांगितले तशा घटना घडत गेल्या यामागे भाजपचे षडयंत्र आहे का असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -