घरताज्या घडामोडीमोदींमध्ये शहीद शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता नाही तर अहंकारच जास्त दिसतो, नाना पटोलेंचं वक्तव्य

मोदींमध्ये शहीद शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता नाही तर अहंकारच जास्त दिसतो, नाना पटोलेंचं वक्तव्य

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शहीद झालेल्या शेतकर्‍यांबद्दल जराही आत्मीयता नाहीं, उलट उद्धट पणा व अहंकारच जास्त दिसतो, हा अनुभव मेघालयचे राज्यपालांना आला. देशाच्या पंतप्रधानांचे असे वागणे योग्य नाहीं'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी आंदोलनामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांबद्दल जराही आत्मीयत नाही तर त्यांच्यामध्ये अहंकारच जास्त दिसतो आणि हा अनुभव मेघालयाच्या राज्यपालांना आला असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मेघालयाच्या राज्यपालांनी घेतली होती. या भेटीमध्ये मोदींनी अहंकाराने वक्तव्य केलं असल्याचे राज्यापालांनी सांगितले आहे. यावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला आहे. मोदींमध्ये उद्धटपणा आणि अहंकारच जास्त दिसतो असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. याचा अनुभव आता मेघालयाच्या राज्यपालांना आला आहे. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी असे वागणे योग्य नाही असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मेघालयाच्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ आणि काही मजकूर ट्वीट करत नाना पटोलेंनी म्हटलं आहे की, ‘अहंकारच्या आकंट मध्ये बुडालेल्या नरेंद्र मोदींना शहीद झालेल्या शेतकर्‍यांबद्दल जराही आत्मीयता नाहीं, उलट उद्धट पणा व अहंकारच जास्त दिसतो, हा अनुभव मेघालयच्या राज्यपालांना आला. देशाच्या पंतप्रधानांचे असे वागणे योग्य नाहीं’. दरम्यान पंतप्रधान मोदी अंहकारामध्ये आकंट बुडाले असल्याचे नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या सभेला उपस्थिती लावली होती. या सभेत संबोधित करताना राज्यपालांनी पंतप्रधानांविरोधी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी त्यांना आपले 500 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असे त्यांना सांगितले त्यावर ते म्हणाले की, ते 500 शेतकरी माझ्यासाठी मेले आहेत का? त्यांनी असा प्रश्न केला तेव्हा ते अहंकारामध्ये होते असे राज्यपाल मलिक यांनी सांगितले. तर पंतप्रधानांना तुमच्याठीच मेले आहेत आणि आता तुम्ही राजा झाला आहात असे प्रत्युत्तर दिलं असल्याचे राज्यपाल मलिक यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पंतप्रधान मोदी अहंकारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ५ मिनिटांच्या चर्चेतही वाद, राज्यापालांच्या दाव्याने एकच खळबळ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -