Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सोलापूरची जागा काँग्रेसची; मविआसोबत लवकरच चर्चा होईल, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

सोलापूरची जागा काँग्रेसची; मविआसोबत लवकरच चर्चा होईल, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Subscribe

सोलापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनपेक्षितपणे वाद सुरु झाला असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूरमधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूरची जागा काँग्रेसची असं मोठं वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सोलापुरात जनतेच्या आशीर्वादानं काँग्रेस पुढे येईल. परंतु सोलापूरची जागा काँग्रेसची असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा सामाजिक जाहीर सत्कार होता. त्यामुळे या कार्यक्रमाला मी आलो होतो. सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. तसेच हे काम अगदी समाधानकारक आहे. अनेक तरूण मंडळी काँग्रेस पक्षात सहभाग घेत आहेत. काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्ह्यात मोठ्या ताकदीनं पुढे येत आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवरून मविआत लवकरच चर्चा होईल.

- Advertisement -

नितीश कुमार हे यूपीएचे समन्वयक झाले आहेत. तर सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. नितीश कुमार हे समन्वयक झाल्यानंतर ते इतर राज्यातील पक्षांच्या नेत्यांची भेटीगाठी घेत आहेत. तसेच विविध प्रकारच्या चर्चा देखील करत आहेत. आता त्यांचा ११ मे रोजी मुंबई दौरा असून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत, असंही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी एका मुलाखतीदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत भाष्य करत भूमिका मांडली. आतापर्यंतची जी लोकशाहीची परंपरा आहे, ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो, तशीच भूमिका घेतली जाईल. परंतु जर कोणत्याही कारणामुळे आमच्यात आघाडी झाली नाही तर काँग्रेसचा प्लॅन बी तयार आहे. कारण, 2014 मध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री आणि जागावाटपाबाबत काँग्रेस सतर्क असणार आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.


- Advertisement -

हेही वाचा : ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही, जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर नाना पटोलेंचा संताप


 

- Advertisment -