…जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, नाना पटोलेंचा सवाल

nana patole

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha elections) येत्या १० जून रोजी पार पडणार आहे. यामध्ये शिवसेना (Shivesena )आणि भाजपा (Bjp) या दोन पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवारी अद्यापही माघे घेतलेला नाहीये. त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार होताना पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यावेळी बैठकीसाठी अपक्षांसह सर्व आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते एच.के.पाटील हे संबोधित करणार आहेत. दरम्यान, या बैठकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबाजवणी करण्याची आठवण करून देऊ. तसेच अपक्ष आमदार नाराज असणं योग्यच आहे. आपल्या मतदारसंघातील कामाबाबत जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे.

…जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?

जे अपक्ष आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. मतदान ही एक संधी असते. या निमित्ताने आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता येतात. या आमदारांनी जनतेच्या हितासाठी काही गोष्टी मांडल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यामध्ये आमदारांचे काय चुकले, असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे.

प्रत्येक अपक्ष आणि छोट्या पक्षांशी संपर्क साधला जात आहे. महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी त्यांना विनंती केली जात आहे. काही अपक्ष आणि छोटे पक्ष सुरूवातीपासूनच आमच्यासोबत आहेत. मात्र, कोणाला बोलायची काय गरज आहे, असं नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीत ज्या मोठ्या पक्षांसोबत अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमदार संवाद साधतील. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत असल्यामुळे त्यांना आम्ही मतदान करण्याची विनंती करणार आहोत. आमचे आमदार आमच्यासोबत आहेत. ते सुद्धा आघाडीलाच मतदान करतील, असं पटोले म्हणाले.

काँग्रेसच्या उमेदवारांची नावे कधी निश्चित होणार?

शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या उमदेवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारांची नावे कधी निश्चित होणार? असा सवाल पत्रकारांनी नाना पटोलेंना विचारला असता पटोले म्हणाले की, विधान परिषदेबाबत उद्या निर्णय घेण्यात येईल.


हेही वाचा : कोणत्याही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास आमदारकी जाणार नाही, पण…