घरमहाराष्ट्रNana Patole : महायुती सरकार तरुणाईला धर्माची अफू, ड्रग्जचे विष देऊन बर्बाद...

Nana Patole : महायुती सरकार तरुणाईला धर्माची अफू, ड्रग्जचे विष देऊन बर्बाद करतंय – नाना पटोले

Subscribe

BVG कंपनीवर एवढी मेहरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्न विचारत या ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मुंबई : पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता पुण्यात सलग तीन दिवस 4 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. या मुद्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू आणि ड्रग्जचे विष देऊन बर्बाद करण्याचे काम करत आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले, राज्यात अंमलीपदार्थांचा काळा धंदा जोरात सुरु आहे. याआधी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सोलापूर मध्येही अंमलीपदार्थांचे मोठे साठे सापडले होते. पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली, ड्रग माफिया मात्र मोकाटच राहिले म्हणूनच पुण्यात 4 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले आहेत. विधानसभेत राज्याचा एक वरिष्ठ मंत्रीच त्यांना धमक्या येत असल्याचे सांगतात यावरून कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते. हे सरकार भ्रष्ट असून फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? बुलढाण्यातील विषबाधा प्रकरणावरुन आव्हाड आक्रमक

ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा ऍम्ब्युलन्सचे कंत्राट..

ऍम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या BVG कंपनीला देशभरातील 7 राज्यांनी ब्लॅकलिस्ट केले आहे, या कंपनीला काम देऊ नये असे आदेश आहेत. BVG कडे जुन्या व कालबाह्य झालेल्या ऍम्ब्युलन्स आहेत. कोरोना काळात या कंपनीला मुदतवाढ दिली होती, त्यानंतर नवीन टेंडर काढून दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्यायला पाहिजे होते परंतु महायुती सरकारने पुन्हा BVG ह्याच कंपनीला कंत्राट दिले आहे. BVG कंपनीवर एवढी मेहरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्न विचारत या ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -