Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नाना पटोले यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

नाना पटोले यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचा देखील समावेश आहे. नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. नाना पटोले यांच्या मुंबईच्या घरातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:लाही विलगिरणात ठेवले आहे.

नाना पटोले विलगिरणात

नाना पटोले यांच्या मुंबईच्या घरात दोन जण कोरोनाबाधित आढळून आल्याने नाना पटोले यांनी स्वत:ला विलगिरणात ठेवले आहे.

बच्चू कडू पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसेच ‘माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी’, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा १९ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर ते क्वारंटाईन होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – वळवळ करणारे साप ठेचायचेच असतात – मुख्यमंत्री


 

- Advertisement -