घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कायदेशीर पेच, नाना पटोले दिल्लीत हायकमांडला भेटणार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कायदेशीर पेच, नाना पटोले दिल्लीत हायकमांडला भेटणार

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर पेचात पडली आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणारं अध्यक्षपद आता आणखीन लांबणीवर जाणार आहे. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्याचसोबतच नागपूर विधानपरिषद सुद्धा काँग्रेसने गमावली आहे. त्यामुळे यासंदर्भातील नेमकं कारणं काय आहे. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कायदेशीर पेच प्रसंग आल्यामुळे आणि नागपूर विधानपरिषद निवडणूक काँग्रेसने गमावल्यामुळे नाना पटोले आज दिल्लीत हायकमांडची भेट घेणार आहेत. तसेच काँग्रसेच्या अंतर्गत असलेली दुफळी याबाबतीत चर्चेला उधाण आलं आहे.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कायदेशीर पेच

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आहे. तरीसुद्धा अधिवेशनाच्या दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली नाहीये. ही निवडणूक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी होणार होती. परंतु विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार गळून पडला.

नाना पटोलेंनी गाठलं दिल्ली दरबार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं होतं. तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुका खुल्या मतदान पद्धतीने होण्यावर राज्यपालांनी बोट ठेवलं आहे. तसेच हे घटनाबाह्य असल्याचं पत्र राज्यपालांनी महाविकास आघाडीला पाठवलं. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार विरूद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष पहायला मिळत आहे. त्यामुळेच नाना पटोलेंनी थेट दिल्ली दरबार गाठलं असून हायकमांडची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं, खासदार संजय राऊतांचा टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -