घरताज्या घडामोडीभाजप सरकारने नोटबंदी करुन जनतेचे खिसे कापण्याचे काम केलं, नाना पटोलेंचा हल्लाबोल

भाजप सरकारने नोटबंदी करुन जनतेचे खिसे कापण्याचे काम केलं, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Subscribe

उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरण्याचे काम मोदी सरकार करत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महागाई, इंधन दरवाढ आणि नोटबंदीवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले होते की, काळा पैसा देशात आणणार सगळ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार परंतू तसे काही केलं नाही केवळ जनतेची फसवणूक केली आहे. नोटबंदी करुन जनतेचे खिसे कापण्याचे काम या भाजप सरकारने केलं आहे. तसेच ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ अशा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करुन देशाची आर्थिक स्थिती बिकट केली. जनतेच्या खात्यात मोदी १५ लाख टाकणार होते. विदेशात असलेला काळा पैसा मोदी भारतात आणार होते. परंतू असे काही झाले नाही. उलट नोटबंदी करुन नागरिक रांगा लावून मेले मात्र मोदींनी सांगितलेले १५ लाख रुपये अद्याप आले नाही. नोटबंदीच्या काळात अनेक अडचणींचा सामना सामन्य जनतेने केला मात्र भाजप सरकारने केवळ खिसे कापण्याचे काम केलं आहे.

- Advertisement -

मोदींनी व्यावसायिकांचे खिसे भरले

पंतप्रधान मोदी आल्यानंतर जीएसटी लागू केला या जीएसटीचा फायदा व्यापाऱ्यांना होत नाही. जीएसटीचे पैसे कोणाच्या घरी गेले याबाबत सर्वांना माहिती आहे. उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कोरोना काळात कायदा लावून लस आणि ऑक्सिजनलाही खरेदी करण्यास भाग पाडले. पुर्वी लस आणि ऑक्सिजन खरेदी करायला पैसै द्यायला लागत नव्हते मात्र आता ती विकत घेण्याची वेळ मोदी सरकारमुळे आली असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोलेंचा इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना येत्या महापालिका निवडणूकांमध्ये दाखवून देऊ असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. दरम्यान नाना पटोले यांनी वाढदिवसानिमित्त समाजासाठी करण्यात येणाऱ्या कामांबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुकही केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -