पावसाअभावी शेतकरी हवालदिल झालेला असताना भाजपला सत्तेची लालसा, नाना पटोलेंची टीका

भाजपला सत्तेची लालसा पडली आहे. लालसेपोटी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणं-देणं नाही असं नाना पटोले म्हणाले.

nana patole

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गटाचा रोख राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाविरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) विसर्जन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील या राजकीय संघर्षाबाबत नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली आहे. एकीकडे पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि दुसरीकडे भाजपला सत्तेची लालसा पडली आहे. लालसेपोटी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणं-देणं नाही असं नाना पटोले म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Nana Patole’s criticism of BJP’s lust for power while farmers are distraught due to lack of rains)

हेही वाचा – शिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर सायंकाळी 5 वाजता होणार सुनावणी

नाना पटोले म्हणाले की, “जनता संभ्रमात आली आहे. एकीकडे राज्यात पाऊस नाही, भाजपला सत्तेच्या लालसेपोटी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. फक्त खुर्ची कशी मिळेल यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. 1 जुलैला शपथविधी होणार, अशा घोषणाही ते करू लागले आहेत. नेमकं काय चाललंय ते कळतच नाही.”

हेही वाचा

ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसचं स्पष्ट आहे, दु:खात असो किंवा सुखात, आपण सोबत राहायचं. ज्याच्याशी मैत्री करायची, ती प्रामाणिक करायची. ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं आणि त्याचंच घर पोखरून टाकायचं ही काँग्रेसची भूमिका नाही. ही भाजपची भूमिका आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. राज्यात पुन्हा निवडणुका लागू नयेत अशीच काँग्रेसची आणि सोनिया गांधी यांची भूमिका आहे. विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.