घरमहाराष्ट्रनाणार प्रकल्पग्रस्त महिलांनी भाजप नेत्याचे बॅनर फाडले

नाणार प्रकल्पग्रस्त महिलांनी भाजप नेत्याचे बॅनर फाडले

Subscribe

कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने आता प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजपकडून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करणारी बॅनर्स प्रकल्पग्रस्त महिलांनी फाडून टाकली आहेत. राजापूर रेल्वे स्टेशन परिसरात भाजकडून हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि राजश्री (उल्का) विश्वासराव यांचे फोटो होते. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त महिलांनी नागपूरमधील आंदोलनावरून परतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी हे बनर्स फाडले.

राजापूर तालुक्यातील नाणार प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नागपुरातील पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजत आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने नागपूरमध्ये आंदोलनही केले. राजापूरमधील शेकडो महिला या आंदोलनाला गेल्या होत्या. एवढा तीव्र विरोध असतानाही भाजप मात्र या प्रकल्प रेटण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच या प्रकल्पाचे स्वागत करणारे बॅनर्स राजापूरमध्ये लावण्यात आले आहेत.

- Advertisement -
Nanar Project Affected
नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या महिला बॅनर फाडताना

या प्रकल्पामध्ये किती कोटींची गुंतवणूक असणार आहे, रोजगारनिर्मिती होणार आहे, असा मजकूर या बॅनर्सवर आहे. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, तसेच समर्थ वुमन्स वेल्फेअर्स असोसिएशनच्या राजश्री (उल्का) विश्वासराव यांचे मोठे फोटो आहेत. एकिकडे तीव्र विरोध असतानाही भाजपकडून अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष आहे. शुक्रवारी संध्याकाळी या असंतोषाचा भडका उडाला आणि संतप्त झालेल्या महिलांनी राजपूर रेल्वे स्टेशन परिसरात लावलेले हे बनर्स फाडून टाकले. उंचावर लावलेली ही बॅनर्स रणरागिणी महिलांनी फाडून टाकत आपला रोष व्यक्त केला. तसेच जिथे जिथे असे बनर्स दिसतील ते फाडून टाकण्याचा निर्धार करत हिंमत असेल तर ज्या गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे, अशा गावांमध्ये हे बॅनर्स भाजपने लावून दाखवावेत असे आव्हान रणरागिणींनी दिले आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून पुन्हा एकदा नाणारमध्ये वातावरण तापू लागले आहे.

Nanar Project Affected

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -