घरताज्या घडामोडीविरोध नसलेल्या जागेतच नाणार प्रकल्प

विरोध नसलेल्या जागेतच नाणार प्रकल्प

Subscribe

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणणार. जिथे लोकांचा विरोध नसेल तिथेच प्रकल्प उभारले जातील. त्या अनुषंगाने विरोध नसलेल्या जागेतच नाणार प्रकल्प करणार असल्याचेही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सांगितले.

सिंधुदुर्गच्या दौर्‍यावर असलेले युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरित करण्याचा विषय महत्त्वाचा आहेच; पण एखादा प्रकल्प दुसरीकडे न्यायचा असेल, तर तिथेही लोकांचा विरोध नसेल हे आधी पहावे लागेल. लोकांना सोबत घेऊन, चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

महामार्ग, रस्ता किंवा कोणताही मोठा प्रकल्प असो स्थानिक लोकांना, भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. एकदा विश्वास बसला, मनातील शंका दूर झाल्यानंतरच आपण ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असेही ते म्हणाले.

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे मत केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -