Eco friendly bappa Competition
घर क्राइम Nanded Crime : हसण्याच्या कारणावरून झाला वाद, विक्रेत्याने तरुणाचे छाटले हात

Nanded Crime : हसण्याच्या कारणावरून झाला वाद, विक्रेत्याने तरुणाचे छाटले हात

Subscribe

नांदेडमधील भाग्यनगर परिसरात हसण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका फळविक्रेत्याने तरुणाचे हात छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरातील आठवडी बाजारात बुधवारी (ता. 16 ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली.

नांदेड : हल्ली क्षुल्लक कारणावरून वाद होतात आणि मग ते विकोपाला जातात. मग हत्या आणि इतर गंभीर गुन्हे घडतात. गेल्या काही महिन्यांपासून अगदी छोट्या कारणावरून वाद होवून त्यांचे पर्यवसन गुन्ह्यांमध्ये झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नांदेडमधील भाग्यनगर परिसरात हसण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका फळविक्रेत्याने तरुणाचे हात छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरातील आठवडी बाजारात बुधवारी (ता. 16 ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद तौहीद असे फळविक्री करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असे या भांडणात हात गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. (Nanded Crime : Argument broke out due to laughter, seller chopped off the youth’s hands)

हेही वाचा – Bihar News : बिहारमध्ये पत्रकाराची हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हम्मद अझर मोहम्मद अजीज हा तरुण भाग्यनगरच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आला होता. यावेळी त्याच्याच शेजारी आरोपी मोहम्मद तौहीद याने त्याच्या फळाची गाडी लावली. यावेळी हे दोघे बोलत असताना त्यांच्यामध्ये हसण्याावरून वाद झाला. हा वाद त्यानंतर विकोपाला गेला. ज्यानंतर आरोपी तौहीद याने रागाच्या भरात येऊन बाजारातून कोयता खरेदी केला. त्यानंतर त्या कोयत्याला धार लावली.

दुपारी आठवडी बाजारात फारशी लोकांची वर्दळ नसते आणि याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी तौहीद याने काही क्षणातच मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले. पण धक्कादायक बाब म्हणजे तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन त्याला जखमी केले. या घटनेनंतर बाजारात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळताच त्यांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिची देण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आरोपी मोहम्मद तौहीद हा फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

- Advertisement -

या प्रकरणाचा भाग्य नगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परंतु महिन्याभरापूर्वीच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच अशीच हात छाटल्याची घटना घडली होती. ज्यामुळे तेव्हा देखील खळबळ उडाली होती. पण आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एक सारखीच घटना पुन्हा घडल्याने कोयत्याने हात छाटणारी गँग सक्रीय झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -