Eco friendly bappa Competition
घर क्राइम नांदेडमध्ये तरुणाच्या रोजच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; गुन्हा दाखल

नांदेडमध्ये तरुणाच्या रोजच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; गुन्हा दाखल

Subscribe

नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगामध्ये एका तरुणाच्या रोजच्या छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तर उद्धव भाऊराव शिंदे असं छेडछाड करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ऋतुजा शिंदे या तरुणाला गावातील उद्धव भाऊराव शिंदे नेहमी त्रास देत होता. आरोपी रस्त्याने येता जाता तिला वारंवार अश्लील चाळे आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायचा. याबाबत तरुणाच्या कुटुंबियांकडे वारंवार तक्रार करूनही त्याने तरुणीला त्रास देणं सुरुचं ठेवलं. या प्रकाराने तरुणीने आपली बदनामी होण्याच्या भीतीने आत्महत्येच पाऊल उचललं. या घटनेमुळे गावात आरोपी उद्धव शिंदे विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

ऋतुजा गावातून येत जात असताना आरोपी उद्धव भाऊराव शिंदे हा अश्लील चाळे करत तिची छेडछाड करत होता, अनेकदा ऋतुजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल, मात्र आरोपीकडून हा त्रास देणं सुरुच होतं. त्यामुळे ऋतुजाच्या कुटुंबियांनी आरोपी उद्धव याचे घर गाठून त्याच्या कुटुबियांना घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच आरोपीच्या कुटुंबियांनी मुलाला समज देण्याबाबत सांगितले. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडला नाही. आरोपी उद्धव शिंदेंकडून सुरु असलेला छळ कमी होत नसल्याने गावात बदनाी होण्याची भीतीने ऋतुजाने राहत्या घरी सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रकाश शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी उद्धव भाऊराव शिंदेंविरोधात मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋतुजाने टोकाचं पाऊल उचलल्याने शिंदे कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होतेय. दरम्यान अशाप्रकारे कुणी त्रास देत असेल तर थेट पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा; कोश्यारींनी लिहिले पंतप्रधानांना पत्र


- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -