Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र हल्ला मोहल्ला मिरवणूक : गुरूद्वारा नजीक डीवायएसपीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांच्या गाड्या फोडल्या

हल्ला मोहल्ला मिरवणूक : गुरूद्वारा नजीक डीवायएसपीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांच्या गाड्या फोडल्या

दगडफेकीनंतर शहरात तणावाचे वातावरण

Related Story

- Advertisement -

शिख समजात होळीनिमित्त हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांनी बंदी घालण्यात आली आहे. राज्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शीख समजाकडून हल्ला मोहल्ला मिरवणूक काढत कोरोना नियमांची पायामल्ली करण्यात आली. या हल्लाबोल निवडणूकीची परवानगी नाकारल्यामुळे संतप्त तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ६ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. संतप्त तरुणांनी केलेल्या दगडफेकेत पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डीवायएसपीवरही जीवघेणा हल्ला झाला आहे. नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्यात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. तरुणांनी केलेल्या दगडफेकीनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणूकीला विरोध केला होता. कोरोना परिस्थिती वाढत असल्यामुळे मिरवणूक काढू नये अशे आदेश देण्यात आले होते. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीख समाजाने जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली होती. हल्लाबोल मिरवणूकीला परवानगी नसतानाही शीख समाजाकडून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान शीख तरुणांनी रस्त्यावर असलेले बॅरिगेड्सची तोडफोड केली होती. तसेच तलवारी काढून शहरात एकच दहशत निर्माण केली होती. यादरम्यान पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ६ ते ७ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हल्ल्याची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, टायरमधील हवा काढून टाकली तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -