Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाNanded Loksabha By Election : ...अन् शेवटच्या क्षणी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा...

Nanded Loksabha By Election : …अन् शेवटच्या क्षणी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुद्धा शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) पार पडली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर शेवटच्या क्षणी आपला गड राखण्यात यश आले आहे.

नांदेड : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा अत्यंत अविश्वसनीय आणि विरोधकांना धक्का देणारा लागलेला आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या 230 उमेदवारांना विधानसभेत निवडून दिल्याने सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा क्लीन स्वीप मिळालेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुद्धा शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) पार पडली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर शेवटच्या क्षणी आपला गड राखण्यात यश आले आहे. काँग्रेसने नांदेड जिल्ह्यातील 09 जागा गमावलेल्या असल्या तरी त्यांना त्यांची ही जागा राखण्यात यश मिळाले आहे. (Nanded Loksabha By Election Congress Ravindra Chavan last minute victory)

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून या मतदारसंघातून डॉ. संतुकराव हंबर्डे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. पण शनिवारी मतमोजणीच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर काँग्रेसला नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही धक्का बसतो का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण शेवटच्या क्षणी काँग्रेसने हा विजय खेचून आणत आपला गड राखला आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण हे मतमोजणीमध्ये दिवसभर पिछाडीवर असलेले पाहायला मिळाले. मात्र दिवसभर पिछाडीवर असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी शेवटच्या काही टप्प्यांत डाव पलटवला आणि विजयश्री खेचून आणली.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Results 2024 : वंचित आघाडीचा फटका कोणाला अन् फायदा कोणाला?

सकाळी 08 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण हे मागे होते. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार विजय मिळवत होते. रवींद्र चव्हाण हे सातत्याने मागे राहात असल्याने ही जागा भाजपाच्या पारड्यात जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांनी हा डाव फिरवला आणि 1457 मतांनी हा विजय मिळवला. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा जागेवर ही पोटनिवडणूक झाली. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या प्रतापराव पाटील यांचा सुमारे 60 हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसोबतच ही पोटनिवडणूक देखील घेण्यात आली होती.

- Advertisement -

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, मी नांदेडच्या जनतेचे आभार मानतो. स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वाद व जनतेची साथ यामुळे माझा विजय झाला आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व जागा महायुतीला गेल्या. मात्र काँग्रेसच्या पडत्या काळात स्वर्गीय वसंत चव्हाण यांनी गड राखला होता. त्यामुळे जनतेने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, असे चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -