घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरनांदेड हादरलं: 24 तासांत 24 जणांचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भयंकर प्रकार

नांदेड हादरलं: 24 तासांत 24 जणांचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भयंकर प्रकार

Subscribe

काही दिवसांपूर्वीच ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

नांदेड : एक दिवस एक रात्र आणि 24 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. हा भयंकर प्रकार नांदेमधील शासकीय रुग्णालयातून उघडकीस आला. याप्रकरणी आता शासकीय वैद्यकीय प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. (Nanded quake 24 dead in 24 hours A terrible situation in the government hospital of Nanded)

काही दिवसांपूर्वीच ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडल्या होत्या. या घटनेची धग शांत झालेली नसताना तोच आता नांदेडमधील शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

राज्यभरातील रुग्णालयात औषधांचा तुटवडा

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. नांदेडमधील घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अबब… बिहारच्या लोकसंख्येत 25 टक्क्यानी वाढ; जातीनिहाय जनगणनेतून प्रकार उघड

मृतांमध्ये यांचा समावेश

शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू झाले त्यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. तर 48 तासांत जन्माला आलेले 6 तर 24 तासांत जन्माला आलेल्या 6 एकुण 12 बालकांचा मृत्यू झाला. तर सर्पदंशावर उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या गंभीर आजारांमुळे यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सोबतच प्रसूतीवेळी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Nobel Prize 2023: नोबेल पुरस्कारांची आजपासून घोषणा; वैद्यकीय क्षेत्रातील दोघांची नावे जाहीर

तत्काळ कारवाई करण्याची मागणी

घडलेल्या घटनेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्वीट केले असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नांदेडमध्ये घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. ठाण्यात झालेल्या घटनेने सरकार आणि सरकारी यंत्रणा काहीही शिकलेली नाही. 12 नवजात मुलांचा मृत्यू एका अर्थाने सरकारी अनास्थेचा बळी आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी वगैरे होत राहील. पण या घटनेला जबाबदार असलेल्यांवर लगोलग कारवाई या सरकारने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -