घरताज्या घडामोडीनांदेडला मुसळधार पावसाचा फटका; पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

नांदेडला मुसळधार पावसाचा फटका; पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

Subscribe

राज्यभराता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्यांला फटका बसला आहे. पावसामुळे नांदेडमध्ये पूरस्थितीत निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यभराता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्यांला फटका बसला आहे. पावसामुळे नांदेडमध्ये पूरस्थितीत निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसानंतर, गेल्या २४ तासात सरासरी ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Nanded school closed due to heavy rain and flood)

गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ५१०.३० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, पैनगंगा, मांजरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारे डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८४.२१ टक्के क्षमतेने भरले आहे. तसेच, नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली, नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय, सखल भागात राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.

महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक धरण भरली आहेत. तर काही धरण कधीही भरु शकतात अशी स्थिती आहे.

- Advertisement -

पुढच्या दोन तासात मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर (Kolhapur Rain Update) जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मध्यम आणि मुसळधार पद्धतीचा पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे तिथं एनडीआरएफचं पथक दाखल करण्यात आलं आहे.


हेही वाचा – मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला ब्रेक, तर मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -