Eco friendly bappa Competition
घर क्राइम मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या तरुणाची आत्महत्या; जोपर्यंत पालकमंत्री येणार...

मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या तरुणाची आत्महत्या; जोपर्यंत पालकमंत्री येणार…

Subscribe

नांदेड : मराठा आरक्षणसाठी नांदेडच्या एका उपोषणकर्त्याने आत्महत्या केली. या उपोषणकर्त्याचे नाव सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारीकर असे असून त्यांनी रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर संपूर्ण नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवसानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडले.

सुदर्शन हा गावातील काही सहकार्यांसोबत उपोषणाला बसलेला होता. गेल्या दोन दिवसापासून सुदर्शनचे उपोषण सुरू होते. मराठा आरक्षण मिळत नसल्याने सुदर्शनने रविवारी रात्री गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदर्शनने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. यात सुदर्शनने लिहेले की, मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे, असे सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केल्यानंतर सुदर्शनचा मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर संपूर्ण नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुरक्षा दिली असती तर हल्ला झालाच नसता; सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीची खंत

जोपर्यंत पालकमंत्री येणार नाही…

आरक्षणासाठी सुदर्शनने आत्महत्या केल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन जोपर्यंत गावाला भेट देणार नाहीत. तोपर्यंत सुदर्शनच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणार नाहीत. तोपर्यंत सुदर्शनचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर अनेक तरुणांनी आत्महत्य करून आपले जीवन संपविले आहे. आतापर्यंत 50 जणांना मराठा आरक्षणासाठी आपले जीव संपविले आहे. गेल्या 15 दिवसातला दुसरा बळी असून सरकार किती बळी घेतल्यानंतर सरकार मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकणार आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारे ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -