घरमहाराष्ट्रनांदेडमध्ये मेथीच्या भाजीतून विषबाधा; एकाचा मृत्यू

नांदेडमध्ये मेथीच्या भाजीतून विषबाधा; एकाचा मृत्यू

Subscribe

कोंडीबा कदम यांच्याघरी दुपारच्या जेवणात मेथीची भाजी बनवली होती. मेथीची भाजी खाल्ल्यानंतर घरातील सर्वांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये धक्कादाक घटना घडली आहे. मेथीच्या भाजीतून विषबाधा झाली आहे. मेथीची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. यामधील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कळगावामध्ये ही घटना घडली आहे. कोंडीबा कदम यांच्याघरी दुपारच्या जेवणात मेथीची भाजी बनवली होती. मेथीची भाजी खाल्ल्यानंतर घरातील सर्वांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – कर्नाटकात प्रसादातून विषबाधा; ११ जणांचा मृत्यू

- Advertisement -

मेथी खाल्ल्याने अचानक त्रास होऊ लागल्याने सर्वांनी रुग्णालयात धाव घेतली. सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले. मात्र कोंडींबा कदम यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कदम यांच्या कुटुंबातील इतर जणांना प्राथमिक उपचारानंतरही अधिक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी शेवटी नांदेडला उपचारासाठी नेण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.


हेही वाचा  – साखरपुड्याच्या जेवणातून ४५ जणांना विषबाधा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -