Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी खवय्यांची चंगळ! खाडी किनारी गाबोळी शिंगाळ्या, बोयटे, कोळंबी, बोंबील

खवय्यांची चंगळ! खाडी किनारी गाबोळी शिंगाळ्या, बोयटे, कोळंबी, बोंबील

Related Story

- Advertisement -

वैशाख अमावस्येमुळे समुद्राला आलेले मोठे उधाण, मुसळधार पावसामुळे आलेले गोडे पाणी यामुळे मजगाव-नांदगाव खाडी किनारी, तसेच लगतच्या उघडी आणि खाजण परिसरात आलेल्या पाण्यात गाबोळी शिंगाळ्या, तरखाडीतील पाण्यात बोयटे, कोळंबी, बोंबील अशी चविष्ट मच्छी सापडत असल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे.

 

- Advertisement -

मुरुड तालुक्यातील समुद्र किनार्‍यावरील खाड्यांच्या आणि उघड्यांच्या परिसरात स्थानिक तरुण गळ टाकून, पाग आणि पेरा मारून किंवा जाळ्यात मच्छी पकडण्यासाठी धडपडताना दिसून येत आहेत. या काळात हे मासे खाजण परिसरातील तिवर अथवा अन्य झाडीझुडपात अंडी घालण्यासाठी येत असतात. त्यामुळे ते जाळ्यात अलगद सापडतात.
कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊन आणि 31 मेपासून 15 ऑगस्टपर्यंत शासनाने मासेमारीवर आणलेल्या बंदीमुळे सध्या मच्छी उपलब्ध होत नसल्यामुळे खवय्यांची तल्लफ हे मासे  भागवित असल्याचे स्थानिक मच्छीमार हरिश्चंद्र तरे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisement -