नंदीच्या मूर्तीपासून ते शिवलिंगपर्यंत 3 दिवसांचा सर्व्हे, ज्ञानवापीच्या सर्व्हेमध्ये काय काय मिळालं?

Nandi idol Shivling found in Gyanvapi Survey

ज्ञानवापी मशिदीमध्ये विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा जैन यांनी केला आहे. तसेच मशिदीमध्ये नंदीची मूर्तीसुद्धा सापडली आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीमध्ये 3 दिवस सर्वेक्षण करण्यात यावे असे निर्देश दिले होते. या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी विहरीत शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ती जागा सील करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत तीन दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम अखेर संपले आहे. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. या विहिरीमध्ये कॅमेरा टाकून पाहण्यात आले. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचा दावा आहे की विहिरीत शिवलिंग सापडले असून ते ताब्यात घेण्यासाठी सत्र न्यायालयात जाणार. परंतु मुस्लिम संघटनांनी हिंदूंचा दावा फेटाळून लावला. पुरातन विहिरीच्या व्हिडिओग्राफीसाठी आत वॉटर प्रूफ कॅमेरा बसवण्यात आला होता. तिसऱ्या फेरीसह सर्वेक्षणाचे काम संपले. तीन दिवसांच्या पाहणीत ज्ञानवापी मशिदीच्या तळापासून ते घुमट आणि पश्चिमेकडील भिंतीपर्यंतचे व्हिडिओग्राफी करण्यात आली. आता हे पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत.

नंदीच्या मूर्तीसमोर सापडले 12 फूट 8 इंच शिवलिंग

हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी शिवलिंग सापडले असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापीच्या वाजुखानामध्ये 12 फूट 8 इंच शिवलिंग सापडले. नंदीच्या समोर असलेल्या विहीरीमध्ये कॅमेराद्वारे पाहणी करण्यात आली. तसेच पाण्याचा उपसा केल्यावर शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग 12 फूट 8 इंच इतक्या आकाराचे आहे. हे विहिरीच्या खोलवर असून ते सापडल्यावर लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि हर हर महादेव अशा घोषणा दिल्या आहेत.

पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण

ज्ञानवापी मशिदीचा सर्वे करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती. तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. सर्व सर्वेक्षण हे व्हिडीओग्राफीसह झाले आहे. 14 मे रोजी ज्ञानवापी मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या दिवशी सकाळी 8 ते 12 या वेळेत सर्वेक्षण करण्यात आले. फेरी-1 मध्ये सर्व 4 तळघरांचे कुलूप उघडून सर्वेक्षण करण्यात आले.

दुसऱ्या दिवसाचे सर्वेक्षण

15 मे रोजी सर्वेक्षणाची दुसरी फेरी झाली.घुमट, नमाज स्थळ आणि वजू स्थळाचे सर्वेक्षण करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही सर्वेक्षणाचे काम चार तास चालले. फेरी-2 मध्ये घुमट, नमाज स्थळ, वजू स्थळ तसेच पश्चिमेकडील भिंतींची व्हिडिओग्राफी झाली. मुस्लिम बाजूने चौथे कुलूप उघडले. घुमटापर्यंत साडेतीन फुटांच्या दरवाजातून सर्वेक्षण करण्यात आले.

तिसऱ्या दिवसाचे सर्वेक्षण

ज्ञानवापी मशिदीमध्ये तिसऱ्या दिवशी २ तास सर्वेक्षण करण्यात आले. पथकाने नंदीजवळील विहिरीतून उर्वरित भागाची पाहणी केली. फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी करण्यात आली. विहीरीमध्ये शिवलिंग सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मशिदीमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक सापडल्याचा दावा

हिंदू पक्षाकडून ज्ञानवापी मशिदीमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, स्वान सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तीन खोल्यांमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, संस्कृत श्लोक आणि स्वान यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. हा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच हिंदू मंदिरांचे खांब सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान सर्वेक्षणाचा अहवाल आणि सत्य १७ मे रोजी न्यायालयाच्या निर्णयानंतर बाहेर येईल.


हेही वाचा : Russia – Ukraine War : युक्रेन सैन्य रशियाविरुद्ध युद्ध जिंकू शकते; नाटो प्रमुखांचा मोठा दावा