नंदुरकरकरांचे आभार! डॉ भारूड म्हणाले अलविदा नंदुरबार

आपल्याला मिळेल्या छोटाशा कालावधीत उत्तम अशी कामगिरीची चमक दाखवलेल्या सनदी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी नंदुरबारवासीयांचे आभार मानले. अलविदा नंदुरबार म्हणत त्यांनी गेल्या दोन वर्षांमधील लेखाजोखा एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडला आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील जनतेने केलेल्या सहकार्याचे आभार मानायला ते विसरले नाहीत. डॉ राजेंद्र भारूड यांना नंदुरबार जिल्हाधिकारी पदावरून आता पुण्यात आदिवासी आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजेंद्र भारूड यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर कोणत्याच प्रकारची पोस्ट केली नव्हती. त्यांनी याआधी १ जुलैला फेसबुक पोस्ट केली होती, पण त्यानंतर मात्र त्यांची पोस्ट पहायला मिळाली नव्हती. अखेर आज मंगळवारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर अनेकांनी या पोस्टला भरभरून असा प्रतिसाद दिला आहे.

काय म्हणाले राजेंद्र भारूड?

सर्व नंदुरकरकरांचे आभार .. गेल्या 2 वर्षांपासून, नंदुरबारमध्ये टीम वर्क व सर्व लोकांच्या समर्थनामुळे अनेक उपक्रम घेतले गेले. बदली हा आमच्या जीवनाचा नियमित भाग आहे परंतु ज्या जिल्ह्यात शिकलो ज्या ठिकाणी वाढलो तिथे काम करण्यासाठी संधी मिळाली याची आठवणी नेहमीच राहील, विविध विभागांच्या चांगल्या कामामुळे दोन्ही कोविड लाटा यशस्वीरित्या हाताळल्या गेल्या,या जिल्ह्यातील सर्वांच्या सहकार्याची व येथील लोकांच्या चांगल्या स्वभावाची आठवण नेहमी स्मरणात राहील.

 

Dr rajendra bharud

 

व्हिडिओची लिकं 

https://fb.watch/v/ahMtuBmpb/