घरताज्या घडामोडी'या' कारणामुळे चिमुरड्यांची झाडावर भरते ऑनलाईन शाळा!

‘या’ कारणामुळे चिमुरड्यांची झाडावर भरते ऑनलाईन शाळा!

Subscribe

जगभरात परलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे अनेक देशातील शाळा बंद आहेत. भारतात देखील २३ मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आता अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन शाळांना सुरूवात झाली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण या ऑनलाईन शाळांचा त्रास शहरी भागांत इंटरनेट आणि इतर सोयी-सुविधांमुळे विद्यार्थ्यांना फारसा होत नाही. पण ग्रामीण भागात ऑनशिक्षणाचा खर्च अनेक विद्यार्थ्यांना परवडत नाहीये. तर काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे शिक्षण घेताना अडळथे निर्माण होत आहेत.

- Advertisement -

पण या सगळ्यावर मात करत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निरनिरळे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्यातील धाडगाव या भागात मोबाईल रेंजच्या समस्येमुळे विद्यार्थी ऑनाईन शिक्षण घेऊ शकत नव्हते. गावातील काही ठराविक भागांत रेंज येते. पण विद्यार्थ्यांचे पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या कारणासाठी एका व्यक्तीने गावातील एका टेकडीवर असलेल्या झाडावर मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे.

या फोटोत तुम्हाला दिसेल सगळी लहान मुलं झाडावर बसून अभ्यास करत आहेत. पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. केवळ नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना झाडावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. यावेळी हा व्यक्ती फळा घेऊन बसला आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये जे काही शिकवले जाईल तो त्या विद्यार्थ्यांना समजावू शकेल.

- Advertisement -

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सोयी-सुविधेची मोठी समस्या आहे. पण अशा परिस्थितीतही काही शिक्षक मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.


हे ही वाचा – प्रतिभावंतांचा परदेशी ओघ थांबणार; परदेशी विद्यापीठे भारतात येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -