घरमहाराष्ट्रशिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवयच; दादरा नगर हवेलीच्या विजयावरून राणेंचा टोला

शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवयच; दादरा नगर हवेलीच्या विजयावरून राणेंचा टोला

Subscribe

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावरून केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला. बऱ्याच दिवसांनी मी माध्यमांसमोर आलो आहे. काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. दादरा नगर हवेलीमध्ये अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला की आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका पिटत आहेत. मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला.

नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. लिखाण करताना संजय राऊत यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं असतं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही असं वाटतं, असा टोला राणेंनी लगावला. आम्ही ३०३ पेक्षा अधिक आहोत. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील, असा घणाघात राणेंनी संजय राऊत यांच्यावर केला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -