घरताज्या घडामोडीDisha Salian case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांबाबत नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Disha Salian case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांबाबत नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Subscribe

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. दिशाचा मृत्यू इमारतीवरून पडून नाही तर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप राणेंनी केला होता. त्यानंतर सालियान कुटुंबियांची राणेंनी बदनामी केल्याचा आरोप करत मालवणी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात मालवणी पोलिसांकडून नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांची काल(शनिवार) तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवल्यानंतर राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी राणेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नारायण राणेंचा गौप्यस्फोट

नारायण राणेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं देखील बोलू नका, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली होती. तसेच यावर मी म्हणालो की, मी एक लोकप्रतिनिधी आहे. यावर आम्ही असं का बोलायचं नाही. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्हाला देखील मुलं आहेत. तुम्ही असं करू नका, अशा प्रकारचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केला आहे.

- Advertisement -

पुढे राणे म्हणाले की, हे वाक्य मी माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे. यायाच अर्थ हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे. मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असं नारायण राणे म्हणाले.

राणे पिता-पुत्रांची तब्बल नऊ तास चौकशी

राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगला असून राज्याचे राजकारण तापले आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात देखील पहायला मिळत आहेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी खळबळजनक आरोप केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सालियान कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाकडे किशोरी पेडणेकर यांनी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर राज्य महिला आयोगाने दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा मालवणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. मात्र, या अहवालात दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे राणे पिता-पुत्रांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : PM Modi Pune Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आंदोलन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -