घरताज्या घडामोडीनारायण राणे आणि उ्दधव ठाकरे एकत्र येऊ शकतात

नारायण राणे आणि उ्दधव ठाकरे एकत्र येऊ शकतात

Subscribe

सध्या ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) भविष्यात एकत्र येऊ शकतात. एकाच ताटात जेवणही करू शकतात. असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर विमानतळावर आज तोगडीया यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले आहे.

सध्या ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण ऱाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली व नंतर जामीन मंजूर करण्यात आला. याघटनेमुळे शिवसेना विरुद्ध राणे सामना रंगला आहे. त्याचदरम्यान, तोगडीया यांनी राजकारणाचा हवाला देत भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येतील असे सांगितले. हे राजकारण आहे. यात काहीही होऊ शकतं. आज भाजपा-शिवसेना जरी विरोधात असले तरी ते उद्या एका ताटात जेवतील, यांचं हे सुरुच राहील. हे कधी भांडतील तर कधी एकमेकांच्या गळ्यात पडतील असेही तोगडीया यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर जो पक्ष देशाच्या हितासाठी काम करेल आम्ही त्याच्या बाजूने उभे राहू. भाजपने देशहिताचे काम केले तर भाजप जिंदाबाद म्हणू, जर शिवसेनेने चांगले काम केले तर शिवसेना जिंदाबादचा नारा देऊ, राष्ट्रवादी, काँग्रेसने चांगले काम केले तर त्यांचाही जयजयकार करू असेही तोगडिया यांनी म्हटले.


हेही वाचा – आपल्याच वहिनीवरती अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं? नाव न घेता राणेंचा खळबळजनक आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -