Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला, नारायण राणेंची 'कोकण'वासीयांसाठी मोठी घोषणा

चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला, नारायण राणेंची ‘कोकण’वासीयांसाठी मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना बोलवले आहे.

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित असणार असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले आहे. ९ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. नारायण राणेंच्या घोषणेमुळे आता शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद उफाळण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ७ ऑक्टोबरला चिपी विमान वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. मात्र शिवसेनेच्या वक्तव्याला महत्त्व नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणेंनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाचा मुहूर्त सांगितला आहे. राणेंनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार आहे. त्याठिकाणी विमान वाहतूक सुरु करण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता केंद्रिया नागरि उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार आहेत. सिंधिया हस्ते विमान वाहतूक सुरु होणार आहे. त्याप्रसंगी मी स्वतः उपस्थित राहणार आहे.

- Advertisement -

या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहे. मागील ७ वर्षांपासून हे विमानतळ बांधून तयार होते. आजच केंद्रिय मंत्री सिंधिया यांच्यासोबत बैठक केली. यानंतर ही माहिती देत आहे. मी स्वतः दिल्लीहून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत दिल्लीहून मुंबई आणि मग रत्नागिरी असा प्रवास करुन चिपी विमानतळावर पोहोचू आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन करु असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री कशाला हवेत?

चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्याची तारिख केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केली आहे. यावेळी नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करणार का? असा प्रश्न करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री कशाला हवेत? मुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना बोलवले आहे. यामुळे मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही. असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा शिवसेना- नारायण राणे आमने सामने येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -