घरताज्या घडामोडी'अजित पवार अजून अज्ञानी आहेत'; राणेंचा पलटवार

‘अजित पवार अजून अज्ञानी आहेत’; राणेंचा पलटवार

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार आहे? असा सवाल करत त्यांनी राणेंवर टीका केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या याच टीकेवर नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. नारायण राणे म्हणाले की, ‘अजून अजित पवार अज्ञानी आहे. त्यांनी आपल्या खात्याकडे बघावं. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप आणि केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार यांच्याकडून शिकावं.’

पुढे नारायण राणे म्हणाले की, ‘मी राज्यातील सरकारला सहाकार्य करणार, निधी देणार, उद्योजक बनवणार आणि त्यांना सांगणार भाजपकडे वळा. या खात्याला थेट अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. अनेक पंतप्रधान योजना आहेत, त्याला मोदी निधी देतात. एकाच वेळेला अजित पवारजी साडे चार लक्ष निधी दिला होता. योजनेसाठी तीन लक्ष कोटी खर्च झाला. अजून एक लक्ष २५ कोटी बाकी आहेत. शिवाय आता वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहता ते ही पैसे आम्हाला अर्थमंत्रालयाकडून दिले जाणार आहेत. पण मला कळत नाही, तुमच्या तिजोरीत काय आहे? अतिवृष्टीला पैसे नाहीत, पूरपरिस्थितीत चिपळूणमधील घरांसह दुकानांच नुकसान झालं. त्यांना अजून एक रुपया नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला ना कर्जमाफी, ना मदत, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, एसटी कामगारांना पगार नाही म्हणून आत्महत्या होऊ लागल्या आहेत. पवार साहेब याची चिंता करा.’

- Advertisement -

अजित पवार काय म्हणाले होते?

पुण्याच्या आढावा बैठकीत अजित पवार म्हणाले होते की, ‘सूक्ष्म आणि लहानमध्ये आता काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचं झालं तर गडकरी यांच्या विभागाकडून दिला जाऊ शकतो. कारण केंद्रीय महामार्ग सगळं त्यांच्याकडे आहेत. गडकरी यांनी निधी दिले आहेत. त्या खात्याचे नाव अवजड असं होत. काही जण गंमतीने त्याला अवघड खातं म्हणायचे. आता त्याच्या नावामध्ये काही बदल झाले आहेत. कोरोनाचं संकट आल्यामुळे सूक्ष्म आणि लूघ खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे असं वाटतंय देशामधील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा.


हेही वाचा – Shiv Sena VS Narayan Rane: ‘सामना’ला आता ‘प्रहार’मधून उत्तर देणार, राणेंचा शिवसेनेला इशारा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -