घरमहाराष्ट्रउद्ध्वस्त ठाकरे म्हणत नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उद्ध्वस्त ठाकरे म्हणत नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त ठाकरे म्हणत टीका केली.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू दौऱ्या केल्यानंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात येत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या बारसूमधील आजच्या सभेला परवानगी नाकारल्याने दौरा रद्द केल्याचे नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त ठाकरे म्हणत टीका केली. (Narayan Rane attacked Uddhav Thackeray by saying Uddhavast Thackeray)

हेही वाचा – बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, रिफायनरीला विरोध करणाऱ्याला आमचा विरोध आहे, हे दर्शविण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. बारसूमध्ये आज उद्ध्वस्त ठाकरे हे रिफायनरीच्या प्रस्तावित जागी पोहोचले. त्यानंतर ते सोलगावला जाऊन काही लोकांना भेटले. यावेळी त्यांची कोणती सभा झाली नाही. म्हणून मी माझा दौरा रद्द केला. उद्धव ठाकरे आज बरंच काही बडबडले. यावेळी त्यांनी अनेक धमक्या दिल्या. तर जेमतेम मुख्यमंत्री होते तेव्हा ते दोनदा मंत्रालयात आले, असे मंत्रालयातील लोकांनी सांगितले. मला म्हणायचे आहे महाराष्ट्रात एवढे नेते आहेत पण मग प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? कोकणातील प्रत्येक विकासाच्या कामाला शिवसेनेने विरोध केला आहे. ज्यांना नीट चालता येत नाही ते पेटवायची भाषा करतात, असा घणाघात राणेंनी केला.

कॅलिफोर्नियात रिफायनरीचे 14 प्रकल्प..
कोकणाचा कॅलिफोर्निया करू हेच लोकं म्हणायचे. तिथे रिफायनरीचे 14 प्रकल्प आहेत. तिथे पर्यावरण नाही का?, हो मी विरोध केला होता, पण आता फ्रान्समधून अहवाल आला त्यानंतर मी माझे मत बदलले. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा मशिनरीज आल्या आहेत, असे त्या अहवालात लिहून आले आहे. त्यामुळे मी माझी भूमिका बदलली, असे यावेळी नारायण राणे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

“महाराष्ट्रातील देशातील सर्वात कमी ताकदीचा पक्ष कोणता तर शिवसेना. चार प्रमुख पक्षांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. स्वत:ला दिर्घ काळ चालता येत नाही. कुणावर हात वर करु शकत नाही. तरीपण पेटवूच्या भाषेत का बोलतात? ते कळत नाही. जेमतेम मुख्यमंत्री होते”, अशी टीका सुद्धा नारायण राणे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -