घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गवासींयांना कोणत्याही उपचारांसाठी मुंबई -पुण्याला जाण्याची गरज नाही; नारायण राणेंचे आश्वासन

सिंधुदुर्गवासींयांना कोणत्याही उपचारांसाठी मुंबई -पुण्याला जाण्याची गरज नाही; नारायण राणेंचे आश्वासन

Subscribe

आमच्या SSPM हॉस्पिटल मध्ये जिह्यातील पहीली “बाय पास “सर्जरी झालेली आहे .आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय महत्वाचा ,आनंदाचा ऐतिहासिक क्षण आहे. माझ अनेक वर्षा च स्वप्न होत ज्या जिल्ह्यात माझा जन्म झाला तिथे एक सुसज्ज हॉस्पिटल असाव .कोणत्याही उपचारा करीता जिल्हावासियाना मुंबई-पुण्याला जाण्या ची आवश्यकता भासू नये .त्यांच्यावर जिल्ह्यातच उपचार व्हावेत अशी माझी इच्छा होती .हे हॉस्पिटल आमच्या साठी धंदा नसून सेवाभावी वृत्तीने विधायक दृष्टिकोन ठेवून जिल्हावासियांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे.अस आमच्या विरोधकाना सांगावस वाटत.आजची बाय पास सर्जरी आम्हाला स्फूर्ति देणारी-प्रोत्साहन देणारी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे, खैरेंवर टीका करत नारायण राणे म्हणाले की, ठाकरे गटातील काही संपलेल्या व्यक्तींवर बोलणे बंद केले आहे. (narayan rane attacked uddhav thackeray group and chandrakant khaire)

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कधी घराबाहेर आले नाहीत. आता ते नेमके कोणत्या कारणामुळे मध्यावधी निवडणुका लागणार बोलले ते त्यांनाच माहित. मुळात मध्यावधी निवडणुका लागण्यासाठी काही तरी घडणे, आपत्ती येणे अपेक्षित असते. परंतु उद्धव ठाकरेंनी नैराश्येच्या भावनेतून मध्यावधी निवडणुका लागणार असे वक्तव्य केल्याचा आरोप नारायण राणेंनी केलेा आहे.

स्वत:ची सत्ता गेली, मुख्यमंत्री पद गेले म्हणून उद्धव ठाकरे मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे बोलत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करत राणे म्हणाले की, चंद्रकांत खैरे रिटायर्ड झाले आहेत. मुळात संपलेल्या व्यक्तीबद्दल मला विचारू नका.

- Advertisement -

हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय रमेश लटकेंच्या कार्याचा, निष्ठेचा; आदित्य ठाकरेंचं ट्विट


 

सिंधुदुर्गवासींयांना कोणत्याही उपचारांसाठी मुंबई -पुण्याला जाण्याची गरज नाही; नारायण राणेंचे आश्वासन
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -