घरताज्या घडामोडीNarayan Rane Press Conference : संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, नारायण...

Narayan Rane Press Conference : संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा आरोप

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल(मंगळवार) शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना एकप्रकारे प्रत्यूत्तर दिलं आहे. संजय राऊत यांचं लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी राऊतांवर केला आहे.

राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

संजय राऊत हे शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पक्षात नाहीयेत. तर त्यांचं लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. राऊत शिवसेनेचे नसून संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटायला गेले होते. तेव्हा फक्त मुख्यमंत्र्यांसोबत आदित्य ठाकरे आणि राऊत होते, असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

ईडीने गप्प न बसता त्यांची पूजा करावी

मुख्यमंत्र्यांनी केलेले व्यवहार हे राऊतांपेक्षा मला माहिती आहेत. तसेच त्यांनी ईडीवर देखील आरोप केले आहेत. त्यामुळे ईडीने आता गप्प न बसता त्यांना आत घेऊन त्यांची पूजा करावी. या मंत्रिमंडळात किती लोकं आत गेले आणि किती जाणार आहेत, यावर राऊत का बोलले नाहीत. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत माझ्याकडे साक्षीदार असल्याचं राणेंनी म्हटलंय.

प्रविण राऊतांशी काय संबंध?

तुम्ही पत्रकार आणि संपादक असून तुमचा प्रविण राऊतांशी काय संबंध आहे. तुम्ही किती व्यवहार केले आहेत. ईडीने प्रविण राऊत यांची चौकशी केल्यानंतर आता आपण सुद्धा अडचणीत येणार आहोत. त्यामुळे अनिल परब यांच्यासह आपल्याला पण अटक होणार अशी भिती निर्माण झाल्याचं राणेंनी म्हटलंय.

- Advertisement -

हेही वाचा : Petrol-Diesel Price : पेट्रोल १२ रूपये तर डिझेल ९.५ रूपयांनी महागले, पाकिस्तानात तेलाच्या किमती काय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -