Homeमहाराष्ट्रकोकणNarayan Rane on Nanar Refinery : कंपन्या येणार असतील तर..., नाणार रिफायनरीबाबत...

Narayan Rane on Nanar Refinery : कंपन्या येणार असतील तर…, नाणार रिफायनरीबाबत राणेंचे मोठे विधान

Subscribe

युती सरकारच्या कार्यकाळात नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यानंतर या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील नाणार गावात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण रद्द करण्यात आले. परंतु, आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे तो खासदार नारायण राणे यांच्यामुळे.

रत्नागिरी : युती सरकारच्या कार्यकाळात नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यानंतर या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील नाणार गावात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण रद्द करण्यात आले. परंतु, आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे तो खासदार नारायण राणे यांच्यामुळे. कारण नारायण राणे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठे विधान केले आहे. कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार, असे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Narayan Rane big statement regarding Nanar Refinery)

खासदार नारायण राणे यांनी सोमवारी (ता. 23 डिसेंबर) रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विधान केले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत अद्याप तरी कोणाशीही बोललेलो नाही. त्यामुळे या प्रकल्पाशी संबंधित कंपन्यांशी बोलल्यानंतर पेट्रोलियम मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करेन. त्यानंतर कंपनीचा जर का होकार असेल तर रत्नागिरीत ती कंपनी 100 टक्के येईल, असे राणे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. पण थेट खासदार नारायण राणे यांनी नाणारबाबत विधान केल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे नाणार रिफायनरी समर्थक सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हेही वाचा… Kumar Vishwas on Baba Ramdev : …अन्यथा मीठ सडले असते, कुमार विश्वासांचा बाबा रामदेवांवर निशाणा

2019 मध्ये नाणार येथील रिफायनरीसाठीचे जमीन अधिग्रहण रद्द केले गेले. त्यानंतर बारसूचा विषय चर्चेत आला. पण, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि निवडणुकीच्या निकालानंतर देखील बार्शी येथे रिफायनरी होणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध मोडून काढण्यामध्ये नारायण राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे नारायण राणे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? भाजपा नाणार रिफायनरीसाठी प्रयत्नशील तर नाही ना? असे प्रश्न यातून उपस्थित होतात.


Edited By Poonam Khadtale